बंद

    कार्यक्रम

    150 दिवस ई गव्हर्नन्स उपक्रमातील उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचा गौरव अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांनी स्विकारला सत्कार मुंबई, दि. २८ : राज्य शासनाच्या १५० दिवस ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत डिजिटल परिवर्तनाची नवी दिशा निर्माण करत १८६.७५ गुण मिळवित सर्वोत्तम मंत्रालयीन विभागात राज्यात प्रथम स्थान पटकाविले आहे. या या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज विभागाच्या तत्कालीन अपर मुख्य सचिव तथा गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांचा गौरव करण्यात आला. शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि डिजिटल सुविधांचा वापर वाढवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रम राबविण्यात आला. ई-गव्हर्नन्स सुधारणा उपक्रमात उत्कृष्ट कार्य केलेल्या शासकीय विभागांचा आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. डिजिटल सेवा वितरण अधिक सक्षम व सुलभ करून नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. त्यासाठी राज्य शासनाने या मूल्यमापनात कार्यालयाची अधिकृत संकेतस्थळ व्यवस्था, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट, एआय व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर तसेच जीआयएस प्रणालीचा प्रभावी वापर या सात महत्त्वाच्या निकषांवर विभागाचे मूल्यमापन केले. या कार्यक्रमाचा कालावधी 7 मे 2025 ते 10 जानेवारी 2026 असा होता. या उपक्रमात मंत्रालयातील ५७ विभागांनी सहभाग घेतला होता. विविध विभागांच्या कामगिरीचे मूल्यमापन ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’कडून 127 निकषांवर करण्यात आले. या स्पर्धेत सार्वजनिक बांधकाम विभागाने 200 पैकी 186.75 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर म्हणाल्या की, “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स उपक्रमातून सार्वजनिक बांधकाम विभागाने डिजिटल परिवर्तन प्रभावीपणे राबवले आहे. नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. या यशामागे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सामूहिक प्रयत्न आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासित भारत संकल्पनेच्या दिशेने राज्य शासन वाटचाल करत असून यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचाही वाटा उचलण्यात येत आहे.” तक्रार निवारणात मोठी झेप १५० दिवसाच्या ई गव्हर्नन्स उपक्रमाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने तक्रार निवारण प्रणाली अधिक सक्षम करत 80 टक्क्यांवरून 99 टक्क्यांपर्यंत तक्रार निवारण दर वाढवला. एस्कलेशन झालेल्या तक्रारींमध्ये 12 टक्क्यांवरून 0.09 टक्क्यांपर्यंत घट झाली. दैनंदिन देखरेख, प्रलंबित तक्रारी ट्रॅक करण्यासाठी विविध स्तरावरील आढावा, वेळेत तक्रार निवारण आदीं उपाययोजनांमुळे ही सुधारणा शक्य झाली. विभागाकडे प्राप्त झालेल्या 1,248 तक्रारींचे विश्लेषण करण्यात आले असून त्यापैकी 39.5 टक्के तक्रारी रस्त्यांच्या देखभाल व गुणवत्तेशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. सेवा देण्याच्या कालावधीत गती लोक सेवा हक्क अंतर्गत आठ सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून या सेवा पूर्णपणे ऑनलाइन करून ‘आपले सरकार’ पोर्टलशी एकत्रित करण्यात आल्या. त्यामुळे सेवा देण्याचा कालावधी 32 दिवसांवरून 20 दिवसांपर्यंत कमी झाला. सेवा स्तर पालनातही 90 टक्क्यांवरून 138 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. या सेवा मुख्यमंत्री डॅशबोर्डशी संलग्नित करण्यात आल्या आहेत. संकेतस्थळ व डिजिटल सुविधा अधिक सक्षम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेतस्थळाचे आधुनिकीकरण करून ते अधिक सुरक्षित, सुलभ व नागरिकाभिमुख करण्यात आले. या संकेतस्थळावर आतापर्यंत 24.60 लाख व्ह्यूज नोंदवले गेले असून मागील 30 दिवसांत 10.77 लाख सक्रिय वापरकर्ते होते. इंटरअँटिव्ह व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटद्वारे नागरिकांना सेवा, अर्ज प्रक्रिया आणि तक्रार निवारणाबाबत मार्गदर्शन केले जात असून व्हॉटसअपद्वारे 10 हजारांहून अधिक संदेश पाठवून लोकसेवा हक्क अंतर्गतच्या सेवांबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली आहे. ई-ऑफिस व डॅशबोर्डमुळे कामकाज गतिमान सार्वजनिक बांधकाम विभागातील 100 टक्के अधिकारी ई-ऑफिसवर कार्यरत झाले आहेत. फाइल प्रक्रिया टप्प्यांमध्ये घट होऊन कामकाज अधिक जलद झाले आहे. तसेच सर्व लोकसेवा हक्क अंतर्गत सेवांसाठी एकत्रित डॅशबोर्ड तयार करून रिअल-टाइम ट्रॅकिंग व अंदाज (predictive analytics) शक्य करण्यात आला आहे. एआय आणि जीआयएसचा प्रभावी वापर पाथहोल गार्ड (Pothole Guard) ही एआय आधारित प्रणाली विकसित करण्यात आली असून याद्वारे रस्त्यांवरील खड्ड्यांची ओळख करून त्यांची दुरुस्ती व पडताळणी करण्यात येत आहे. रस्त्यांच्या पृष्ठभागाची गुणवत्ता व सुरक्षितता सुधारण्यासाठी एआय प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. तसेच पीएम गती शक्ती पोर्टलद्वारे रस्ता नियोजन करताना जंगल, वन्यजीव मार्ग व खनिज क्षेत्रे ओळखून 27 हेक्टर वनक्षेत्र वाचवण्यात आले आहे. वृक्षलागवड व नवकल्पनांना चालना ट्री अँप द्वारे वृक्षलागवडीचे स्मार्ट निरीक्षण करण्यात येत आहे. या अँपद्वारे आतापर्यंत 8.20 लाखांहून अधिक झाडांची नोंद व निरीक्षण करण्यात आले आहे. या डिजिटल उपक्रमांमुळे विभागाला ‘डिजिटल इनोव्हेशन ऑफ द इयर अवॉर्ड (Digital Innovation of the Year Award) ही मिळाला आहे. मा. मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभाग प्रथम क्रमांकावर

    150 दिवस ई गव्हर्नन्स उपक्रमातील उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचा गौरव

    150 दिवस ई गव्हर्नन्स उपक्रमातील उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचा गौरव अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर आणि…

    वर पोस्ट: 29th March, 2026
    Public Works Department honoured by the Chief Minister for outstanding work in the 150-day e-Governance initiative

    सार्वजनिक बांधकाम विभागाने सेवाकर्मी पुरस्कार कार्यक्रमात द्वितीय क्रमांक प्राप्त केला

    सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सेवाकर्मी पुरस्कार कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

    वर पोस्ट: 28th March, 2026
    PWD ट्री प्लांटेशन ॲपला बिल्ड इन्फ्रा 2026 मध्ये प्रतिष्ठित डिजिटल नवोपक्रम पुरस्कार मिळाला

    सार्वजनिक बांधकाम विभाग वृक्ष लागवड व देखरेख प्रणालीला बिल्ड इन्फ्रा 2026 मधील डिजिटल इनोव्हेशन पुरस्कार

    सार्वजनिक बांधकाम विभाग यांना बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड्स 2026 मध्ये रस्ते आणि महामार्ग विभागातील वर्षातील उत्कृष्ट डिजिटल नवोपक्रम पुरस्कार वृक्ष…

    वर पोस्ट: 26th February, 2026
    सेवाकर्मी कार्यक्रम

    सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सेवाकर्मी पुरस्कार कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

    विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करीत असताना पारदर्शक, गतिमान सुप्रशासनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अधिकारी/कर्मचारी यांच्या शासकीय सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याकरिता…

    वर पोस्ट: 27th January, 2026
    मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प.

    मा. अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर (भा.प्र.से.) यांनी मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

    ₹6,695 कोटी खर्चाचा हा प्रकल्प मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यान 13.3 किमी लांबीचा आहे, जो लोणावळा ते…

    वर पोस्ट: 23rd January, 2026
    पीडब्ल्यूडी १५० दिवसांचा निकाल

    मा. मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभाग प्रथम क्रमांकावर

    महाराष्ट्र शासनाने संकेतस्थळे, आपले सरकार, ई-ऑफिस, डॅशबोर्ड, व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) / ब्लॉकचेन, GIS अशा ई-गव्हर्नन्स उपक्रमांमध्ये वेगवान प्रगती…

    वर पोस्ट: 26th January, 2026
    दुर्गम ते सुगम

    दुर्गम ते सुगम

    महाराष्ट्रातील उंच डोंगरांवरील पवित्र धार्मिक स्थळे, शिवाजी महाराजांचे गड किल्ले आणि नयनरम्य पर्यटन स्थळांवर फक्त काही निवडक साहसी गिर्यारोहकानांच पोहचता…

    वर पोस्ट: 25th January, 2026
    मा. श्रीम. मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी श्रीक्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या कामाचा आढावा घेतला

    मा. श्रीम. मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी श्रीक्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या कामाचा आढावा घेतला

    दि. 16 जानेवारी, 2026 रोजी मा. श्रीम. मनीषा पाटणकर-म्हैसकर, अ.मु.स. (सा.बां.) यांनी श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदीर विकास आराखड्याच्या कामाचा आढावा…

    वर पोस्ट: 16th January, 2026
    अमरावती येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बांधकाम प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा माननीय सचिव (काम) यांनी घेतला

    मा. सचिव (बांधकामे) यांनी अमरावतीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारत प्रकल्पाचा आढावा घेतला

    मा. सचिव (बांधकामे) श्री. आबासाहेब पंडितराव नागरगोजे यांनी अमरावती येथील सार्वजनिक बांधकाम विभाग इमारत प्रकल्प तसेच विविध संबंधित उपक्रमांच्या प्रगतीचा…

    वर पोस्ट: 19th January, 2026
    माननीय अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर यांनी रस्ते आणि इमारतींच्या निविदा, योजना आणि इतर विभागीय उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

    मा. अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर यांनी रस्ते व बांधकाम निविदा प्रक्रिया, योजना तसेच इतर विभागीय उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला

    सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर, भा.प्र.से., मा. अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित…

    वर पोस्ट: 10th January, 2026
    धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे नवीन न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन_2

    तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथे नवीन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन

    नवीन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन माननीय न्यायमूर्ती श्री. प्रसन्न भा. वराळे (सर्वोच्च न्यायालय, भारत) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. (२०/१२/२०२५) या प्रसंगी…

    वर पोस्ट: 23rd December, 2025
    व्हाट्सअॅप इमेज २०२५-१२-१६ रोजी १२.४१.४०

    मा. मंत्री श्री. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सातारा–कागल राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला

    सातारा–कागल राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले असून, सदर कालमर्यादेचे काटेकोर पालन होईल, यासाठी…

    वर पोस्ट: 16th December, 2025
    नागपूर-चंद्रपूर एक्सप्रेसवे हाय-स्पीड हायवे

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत नागपूर–चंद्रपूर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या 204 किमी सुधारित आखणीला मंजुरी…

    वर पोस्ट: 9th December, 2025
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'झेब्रू 'रस्ता सुरक्षा जागरूकता शुभंकर' चे लोकार्पण_2

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘झेब्रु – रस्ता सुरक्षा जनजागृती शुभंकर’चे अनावरण.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे ‘झेब्रु – रस्ता सुरक्षा जनजागृती शुभंकर’चे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

    वर पोस्ट: 22nd December, 2025
    स्क्रीनशॉट २०२५-१२-०१ १६१६००

    कॅबिनेट पायाभूत सुविधा समितीकडून प्रमुख सहा पदरी महामार्ग प्रकल्पांना मान्यता

    कॅबिनेट पायाभूत सुविधा समितीची बैठक माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पुणे–शिरूर राष्ट्रीय महामार्गावरील ५३.४…

    वर पोस्ट: 18th November, 2025
    4

    मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील नवीन उच्च न्यायालय संकुलाचा भूमिपूजन समारंभ

    मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि मा. भारताचे मुख्य न्यायाधीश श्री. भूषण गवई यांच्या हस्ते नवीन उच्च न्यायालय संकुलाचे भूमिपूजन…

    वर पोस्ट: 1st December, 2025
    2

    मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंह भोसले यांनी कोल्हापूर–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील पाहणी केली

    मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंह भोसले यांनी कोल्हापूर–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांची तातडीने पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या…

    वर पोस्ट: 1st December, 2025
    मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक

    मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक

    बुधवार, दि. 13 ऑगस्ट 2025 रोजी उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आढावा बैठक…

    वर पोस्ट: 13th August, 2025
    चाकण परिसरातील वाहतूक सुरळीत करण्याबाबत आढावा बैठक

    चाकण परिसरातील वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना राबवण्यासाठी आढावा बैठक

    चाकण चौक तसेच एमआयडीसी चाकण येथील वाहतूक कोंडीच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली…

    वर पोस्ट: 31st July, 2025
    महाराष्ट्र रस्ते विकास जोडणी योजनेची अंमलबजावणी

    महाराष्ट्र रस्ते विकास संपर्क साखळी योजना प्रत्यक्ष राबवा

    मंत्रालयात महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडित विविध विषयांवर महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या समवेत महत्वाची बैठक…

    वर पोस्ट: 25th July, 2025
    पनवेलमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालय आणि की ब्रिज प्रकल्पांचे उद्घाटन

    पनवेलमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालय व पूल प्रकल्पांचे उद्घाटन

    आज दिनांक १९ जुलै २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पनवेल येथील विभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन, तसेच पनवेल – नेरे…

    वर पोस्ट: 19th July, 2025
    छत्रपती संभाजीनगरमधील रस्ते प्रकल्पांच्या प्रगतीचा माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी घेतला आढावा

    छत्रपती संभाजीनगरमधील रस्ते प्रकल्पांचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली

    छत्रपती संभाजीनगर शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्यां संदर्भात मा.ना.शिवेंद्रसिंहराजे भोंसले सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथील सभागृहात बैठक…

    वर पोस्ट: 16th July, 2025
    विधानभवन नागपूरच्या नूतनीकरणाचा आढावा माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला

    माननीय मुख्यमंत्री यांनी विधानभवन नागपूर नूतनीकरण आणि विस्ताराचा मराठीत आढावा घेतला

    विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील विधानभवनाच्या नूतनीकरण आणि विस्तारीकरणासंदर्भात…

    वर पोस्ट: 18th July, 2025
    माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

    मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला

    मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची…

    वर पोस्ट: 12th July, 2025
    माननिय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मानखुर्द महामार्गावरील रहिवाशांचे एसआरए सर्वेक्षण आणि पुनर्वसन प्रस्तावित केले

    माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी मानखुर्द महामार्गावरील रहिवाशांचे एसआरए सर्वेक्षण आणि पुनर्वसन करण्याचे निर्देश दिले

    सायन-पनवेल महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील विशेष राज्य महामार्ग आहे. यामध्ये मानखुर्द परिसरात या महामार्गाच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून…

    वर पोस्ट: 11th July, 2025
    माननीय मंत्र्यांनी मौजे तांडला येथील ९२ अतिक्रमित एकर जमिनीच्या भूसंपादन स्थितीचा आढावा घेतला आणि आवश्यक उपाययोजनांवर चर्चा केली.

    सार्वजनिक बांधकाम विभागाचे माननीय मंत्री यांनी मौजे तांडला येथील भूसंपादनाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

    सार्वजनिक बांधकाम विभागाचे माननीय मंत्री यांनी अतिक्रमित ९२ एकर जमिनीच्या भूसंपादनाच्या स्थितीचा आढावा घेतला आणि आवश्यक सुधारणात्मक उपाययोजनांवर चर्चा केली.

    वर पोस्ट: 10th July, 2025
    श्री क्षेत्र पोहरादेवी विकासाबाबत आढावा बैठक

    श्री क्षेत्र पोहरादेवी विकास कामांचा आढावा

    श्री क्षेत्र पोहरादेवी येथील विकास कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. मा. मंत्री श्री. संजय राठोड यांनी संत सेवालाल महाराज मंदिराच्या…

    वर पोस्ट: 3rd July, 2025
    नाशिक कुंभमेळ्याची तयारी

    नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त रस्ते विकास योजनांचा मा. मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा

    मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते विकास मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील ‘सिंहस्थ कुंभमेळा’च्या निमित्ताने रस्ते…

    वर पोस्ट: 2nd July, 2025
    व्हाट्सअॅप इमेज २०२५-०७-०२ दुपारी ४.०५.०१ वाजता

    मा.मुखमंत्री,महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्प करीत भूसंपादन कार्यवाहीची आढावा बैठक

    मा.मुखमंत्री,महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्प करीत भूसंपादन कार्यवाहीची आढावा बैठक    

    वर पोस्ट: 2nd July, 2025
    माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी पुलांचा आढावा घेतला आणि स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश दिले

    मा मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत पुलांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आढावा बैठक

    मा मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत पुलांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आढावा बैठक            

    वर पोस्ट: 2nd July, 2025