सार्वजनिक बांधकाम विभागाने सेवाकर्मी पुरस्कार कार्यक्रमात द्वितीय क्रमांक प्राप्त केला
सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सेवाकर्मी पुरस्कार कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि मंत्री आशिष शेलार उपस्थित होते.