सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सेवाकर्मी पुरस्कार कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करीत असताना पारदर्शक, गतिमान सुप्रशासनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अधिकारी/कर्मचारी यांच्या शासकीय सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याकरिता 150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम राबविण्यात आला.
या मोहिमेमध्ये राज्यातील 42 मंत्रालयीन सचिवांच्या अधिनस्त 93 शासकीय आस्थापनांनी केलेल्या कामगिरीचे सामान्य प्रशासन विभागातर्फे गुणांकन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे मूल्यमापन करताना सेवाकर्मी घटकात विभागाचा आकृतिबंध, सेवा प्रवेश नियम,पदोन्नती स्थिती, सरळसेवा भरती स्थिती, अधिकारी/कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल, अनुकंपा तत्त्वावरील भरती, iGot portal द्वारे प्रशिक्षण, विभागीय चौकशी प्रकरणांचा निपटारा अशा विविध 8 मुद्यांचा समावेश केला.
तर सेवाकर्मी टेक घटकात पदोन्नती स्थिती, डिजिटाईज महापार (गोपनीय अहवाल), iGOT कोर्सेस व डिजिटल पोर्टल E-HRMS अशा 4 घटकांचा समावेश होता.
यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला 178/200 गुण मिळाले असून दुसरा क्रमांक प्राप्त झालेला आहे.
सर्वांचे हार्दिक अभिनंदन! 💐💐