बंद

    श्री क्षेत्र पोहरादेवी विकास कामांचा आढावा

    • प्रारंभ तारीख : 03/07/2025
    • शेवट तारीख : 03/07/2025
    • ठिकाण : Mantralaya

    श्री क्षेत्र पोहरादेवी येथील विकास कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. मा. मंत्री श्री. संजय राठोड यांनी संत सेवालाल महाराज मंदिराच्या बांधकामास प्राधान्य देण्याचे निर्देश दिले तसेच नुकत्याच उद्घाटन झालेल्या संग्रहालयासाठी पुढील नियोजन करण्यास सांगितले. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर, वाशिम जिल्हा प्रशासन तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.