बंद

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक.

    • प्रारंभ तारीख : 09/12/2025
    • शेवट तारीख : 09/12/2025
    • ठिकाण : Vidhan Bhavan

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत नागपूर–चंद्रपूर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या 204 किमी सुधारित आखणीला मंजुरी देण्यात आली.

    नागपूर – चंद्रपूर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाअंतर्गत केंद्र शासनाच्या गतीशक्ती पोर्टलकडून प्राप्त सूचनांचा विचार करून एकूण 204 किलोमीटर लांबीच्या सुधारित रस्ता आखणीस मान्यता देण्यात आली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील सेलडोह इंटरचेंज ते दुर्ग हैदराबाद महामार्गावरील नवेगाव (मोर)पर्यंत महामार्ग बांधण्यात येणार आहे. याची एकूण लांबी 192 किलोमीटर असणार आहे. तसेच 11 किलोमीटर लांबीचा चंद्रपूर जोड रस्ता पूर्वीच्या आखणीनुसार कायम ठेवण्यात आला आहे. सुधारित रस्ता आखणीमुळे 27 हेक्टर वन क्षेत्र संपादनात बचत होणार आहे. तसेच मुंबई शहरातील घाटकोपर पूर्व, चेंबूर आणि अंधेरी (प.) आंबिवली मुद्रण कामगार नगर व चुनाभट्टी येथील भूखंडांचा खासगीकरणाच्या माध्यमातून विकासाच्या मुदतवाढीस देखील मान्यता देण्यात आली.

    यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व संबंधित अधिकारी उपस्थित होते.