बंद

    मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक

    • प्रारंभ तारीख : 13/08/2025
    • शेवट तारीख : 13/08/2025
    • ठिकाण : मुंबई

    बुधवार, दि. 13 ऑगस्ट 2025 रोजी उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आढावा बैठक घेण्यात आली. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, कोकणात प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
    या बैठकीस मा. ना. शिवेंद्रसिंहराजे भोंसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री; मा. अदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री; खा. सुनिल तटकरे; ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव, वित्त विभाग; डॉ. राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त, नियोजन विभाग; तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.