बंद

    मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंह भोसले यांनी कोल्हापूर–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील पाहणी केली

    • प्रारंभ तारीख : 29/10/2025
    • शेवट तारीख : 29/10/2025
    • ठिकाण : मंत्रालय, मुंबई

    मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंह भोसले यांनी कोल्हापूर–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांची तातडीने पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गळित हंगामाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर व सातारा परिसरातून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक सुरळीतपणे होण्यासाठी आणि या महत्त्वाच्या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
    या पाहणी बैठकीस मा. आमदार श्री मनोज घोरपडे, सचिव (कार्यक्षेत्र) श्री.आबासाहेब पंडीतराव नागरगोजे, प्रादेशिक अधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, श्री अंशुमाली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक श्री. संजय कदम आणि उपसचिव श्री. सचिन चिवटे उपस्थित होते. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि परिवहन विभागाचे अधिकारी यांनीही बैठकीत सहभाग घेतला.