कॅबिनेट पायाभूत सुविधा समितीकडून प्रमुख सहा पदरी महामार्ग प्रकल्पांना मान्यता
कॅबिनेट पायाभूत सुविधा समितीची बैठक माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पुणे–शिरूर राष्ट्रीय महामार्गावरील ५३.४ किलोमीटर लांबीच्या सहा पदरी महामार्गाच्या बांधकामास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामध्ये चार पदरी जमिनीला समांतर (ॲट-ग्रेड) रस्ता व सहा पदरी उन्नत महामार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे शेंद्रा व बिडकीन औद्योगिक क्षेत्र तसेच छत्रपती संभाजीनगर–पुणे मार्गावरील बिडकीन–ढोरेगाव टप्प्यातील जोडणी अधिक सक्षम होणार आहे.
या बैठकीस माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, माननीय महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे आणि माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंह भोसले उपस्थित होते. मुख्य सचिव श्री. राजेश कुमार तसेच वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.