मा. अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर (भा.प्र.से.) यांनी मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
₹6,695 कोटी खर्चाचा हा प्रकल्प मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यान 13.3 किमी लांबीचा आहे, जो लोणावळा ते खोपोली (19 किमी) या मूळ अंतराच्या तुलनेत कमी आहे. प्रकल्पात टनेल-1 (1.68 किमी) आणि टनेल-2 (8.87 किमी) असा एकूण 10.55 किमी लांबीचा बोगदा समाविष्ट असून 23.50 मीटर रुंदीचा जगातील सर्वात रुंद रस्ता-बोगदा यामध्ये आहे. व्हायाडक्टची एकूण लांबी 1.60 किमी असून व्हायाडक्ट-1 हे 50 मीटर उंच आणि 950 मीटर लांबीचे आहे, तर व्हायाडक्ट-2 (केबल-स्टे ब्रिज) हे 184 मीटर उंच आणि 650 मीटर लांबीचे आहे.
मा. अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर यांनी बोगदा कामांची प्रगती, कठीण डोंगराळ भागातील व्हायाडक्ट बांधकाम आणि महत्त्वाच्या तांत्रिक बाबींचा आढावा घेतला तसेच गुणवत्तेचे निकष पाळून कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला.


