महाराष्ट्र रस्ते विकास संपर्क साखळी योजना प्रत्यक्ष राबवा
मंत्रालयात महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडित विविध विषयांवर महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या समवेत महत्वाची बैठक झाली. प्रत्येक महसूल विभाग महामार्गाच्या माध्यमातून अन्य राज्यांशी जोडण्याची तयारी करून वाहतुकीची गरज, पर्यटनवाढ व स्थानिक विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र रस्ते विकास संपर्क साखळी योजना प्रत्यक्षात राबविण्याच्या सूचना बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.