दुर्गम ते सुगम
महाराष्ट्रातील उंच डोंगरांवरील पवित्र धार्मिक स्थळे, शिवाजी महाराजांचे गड किल्ले आणि नयनरम्य पर्यटन स्थळांवर फक्त काही निवडक साहसी गिर्यारोहकानांच पोहचता येते.
आता महाराष्ट्र शासनच्या दुर्गम ते सुगम धोरणा अंतर्गत ही सर्व धार्मिक स्थळे, गड किल्ले, पर्यटन स्थळ रोपवे आणि फ्युनिक्युलरच्या माध्यमातून पर्यटकांना सुगम करण्यात येत आहेत.
या दुर्गम ते सुगम योजने अंतर्गत नुकतीच मलंगगड जिल्हा ठाणे येथे फ्युनिक्युलर रोपवे सुरू करण्यात आला. फ्युनिक्युलर रोपवे होण्यापुर्वी मलंगगड येथे सुमारे 2500 पायऱ्या चढून जायला २ तास लागत. आता फ्युनिक्युलरच्या माध्यमातून सदर उंचीवर अवघ्या 4 मिनिटांमध्ये जाणे शक्य आहे.
मा. अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर (भा.प्र.से.) यांनी अंबरनाथ, ठाणे येथे पूर्ण झालेल्या हाजी मलंग फ्युनिक्युलर ट्रॉली प्रकल्पाला भेट दिली.


