तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथे नवीन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन
नवीन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन माननीय न्यायमूर्ती श्री. प्रसन्न भा. वराळे (सर्वोच्च न्यायालय, भारत) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. (२०/१२/२०२५) या प्रसंगी माननीय मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर उच्च न्यायालय मुंबई तसेच माननीय न्यायमूर्ती श्री. रवींद्र वि. घुगे, माननीय न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी,माननीय न्यायमूर्ती श्री. शैलेश प. ब्रम्हे उच्च न्यायालय, मुंबई यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी बोलताना मा न्यायमूर्ती वराळे साहेबांनी तुळजापुर न्यायालय इमारत हि महाराष्ट्रातील तालुकास्तरावरील आदर्श व देखणी वास्तू बांधल्याबद्धल सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रशंसा केली.





