बंद

    मा. श्रीम. मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी श्रीक्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या कामाचा आढावा घेतला

    • प्रारंभ तारीख : 16/01/2026
    • शेवट तारीख : 16/01/2026
    • ठिकाण : श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदीर

    दि. 16 जानेवारी, 2026 रोजी मा. श्रीम. मनीषा पाटणकर-म्हैसकर, अ.मु.स. (सा.बां.) यांनी श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदीर विकास आराखड्याच्या कामाचा आढावा घेतला. सदर बैठकीवेळी श्री. पुजार,जिल्हाधिकारी, धाराशिव, श्री. चव्हाण, मुख्य अभियंता, सा.बां.प्रा.विभाग, छ.संभाजीनगर, श्री. भंडे, अधीक्षक अभियंता, सा.बां.मंडळ, धराशिव व इतर संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
    महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजा भवानी मंदीर व तुळजापूर शहराचा विकास साधण्यासाठी एकुण रु. 1865 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.
    सदर विकास आराखड्याचे काम टप्या-टप्याने हाती घेण्यात येणार असून पहिल्या टप्प्यामध्ये रामदरा तलावाच्या मागील बाजूस असलेल्या डोगरावर आई श्री तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार आशिर्वाद रुपात प्रदान करत असलेले 108 फुट उंच भव्य शिल्प नियोजित आहे.

    WhatsApp Image 2026-01-21 at 1.24.10 PM (5)   मा. श्रीम. मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी श्रीक्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या कामाचा आढावा घेतला