चाकण परिसरातील वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना राबवण्यासाठी आढावा बैठक
चाकण चौक तसेच एमआयडीसी चाकण येथील वाहतूक कोंडीच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.चाकण चौक तसेच चाकण एमआयडीसी येथील सततच्या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंह भोसले यांनी दिल्या.नाशिक फाटा ते खेड रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास द्यावयाच्या पत्राची कार्यवाही आजच करण्यात यावी, अशी सूचना मंत्री श्री.भोसले यांनी यावेळी दिली.