बंद

    माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी मानखुर्द महामार्गावरील रहिवाशांचे एसआरए सर्वेक्षण आणि पुनर्वसन करण्याचे निर्देश दिले

    • प्रारंभ तारीख : 11/07/2025
    • शेवट तारीख : 11/07/2025
    • ठिकाण : विधान भवन.

    सायन-पनवेल महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील विशेष राज्य महामार्ग आहे. यामध्ये मानखुर्द परिसरात या महामार्गाच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बांधकाम करून नागरिक राहत आहेत. त्या जमिनीचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए)च्या मार्फत सर्वेक्षण करून त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी या संदर्भातील दिले. बैठकीस आमदार सना मलिक शेख, सचिव संजय दशपुते, उपसचिव प्रज्ञा वाळके, अवर सचिव सुधीर शिंगाडे आदिसह अधिकारी उपस्थित होते.