कुंदन धबधबा, जिल्हा-ठाणे

शहापूर तालुक्यातील कुंदन धबधबा हे एक क दर्जा प्राप्त पर्यटन स्थळ आहे. कुंदन धरणातून वाहणाऱ्या पाण्यामुळे हा धबधबा 12 महिने वाहत असतो यामुळे येथील पर्यटकांचा ओघ जास्त आहे, या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पर्यटन क्षेत्र विकास योजने अंतर्गत कमानी पूल व घाटचे बांधकाम करण्यात आलेले आहे.