परिचय
महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) 150 वर्षांहून अधिक काळाचा समृद्ध वारसा आहे. सा.बां.वि. प्रामुख्याने रस्ते, पूल व सरकारी इमारतींचे बांधकाम आणि देखभालीसाठी जबाबदार आहे आणि त्याचबरोबर राज्य सरकारचे तांत्रिक सल्लागार म्हणूनही सा.बा. विभाग काम करतो.
सुरुवातीला विभाग सिंचन, रस्ते, पूल आणि सरकारी इमारती, या प्रकल्पांची बांधकामे व देखरेख करत असे. तथापि, 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, विभागाची पुनर्रचना दोन स्वतंत्र विभागांमध्ये करण्यात आली. (पाटबंधारे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग). 1980 मध्ये गृहनिर्माण कार्ये एका वेगळ्या विभागाकडे सोपवण्यात आली, ज्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आपल्या सध्याच्या भूमिकेत स्थिर झाला
सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) महाराष्ट्र राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात आघाडीची भूमिका बजावतो, सार्वजनिक मालमत्तेचे कार्यक्षम नियोजन, अंमलबजावणी आणि देखभाल सुनिश्चित करतो. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा रस्त्यांचे बांधकाम व देखभाल आणि सरकारी इमारतींचे बांधकाम आणि देखभालासाठी हा विभाग जबाबदार आहे. हा विभाग इतर विभागांसाठी ठेव अंशदान कामांअंतर्गत बांधकाम देखील करतो.