बंद

    धबधबा

    कुंदन धबधबा – शहापूर तालुक्यातील एक निसर्गरम्य आकर्षण

    शहापूर तालुक्यातील कुंदन धबधबा हे एक क दर्जा प्राप्त पर्यटन स्थळ आहे. कुंदन धरणातून वाहणाऱ्या पाण्यामुळे हा धबधबा 12 महिने वाहत असतो यामुळे येथील पर्यटकांचा ओघ जास्त आहे, या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पर्यटन क्षेत्र विकास योजने अंतर्गत कमानी पूल व घाटचे बांधकाम करण्यात आलेले आहे.

    एमडीआर-६४

    शहापूर तालुक्यातील शेणवा -किनावली – सरळगाव – देहरी रस्ता प्र. जि. मा. 64 हा रस्ता मुरबाड व शहापूर तालुक्याना जोडणारा महत्वपूर्ण रस्ता आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्नूयटी प्रकल्पच्या माध्यमातून या रस्त्याचे एकूण 32.00 कीं मी लांबी व 10.00 मी रुंदीचे रुंदीकरण व नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

    पूल (पत्ता पुणे नाही तर नागपूर आहे)

    महाराष्ट्र व तेलंगणा राज्याला जोडणारा सिरोंचा येथील प्राणहिता नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे ज्यामुळे मंचुरियन ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ६३ ला जोडणारा मार्ग प्रवाशांना प्रवासास सोयीस्कर ठरत आहे.

    राजभवन

    राजभवन, मुंबई हे १८८० पासून, ब्रिटिश काळापासून, महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. दक्षिण मुंबईतील मलबार हिलच्या टोकावर वसलेले हे राजभवन ४७ एकरांमध्ये पसरलेले असून तीन बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेले आहे. हे संकुल ऐतिहासिक बॉम्बे किल्ल्याचा भाग मानले जाते आणि सांस्कृतिक व राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. राजभवन हे केवळ एक इमारत नसून जलभूषण, जलकिरण, जलचिंतन, जललक्षण, बँक्वेट हॉल, दरबार हॉल आणि राज्यपाल सचिवालय अशा अनेक ऐतिहासिक इमारतींचा समुच्चय आहे. या संकुलातील प्रत्येक इमारत ऐतिहासिक, राजकीय व वास्तुशैलीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे आणि राज्याच्या शासकीय परंपरेची साक्ष देते.